नांदेड - नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भाजपाच्या कव्हेकरांनी दिला धीर
लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)भारतीय जनता पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी आज कव्हा गावातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अंबादास देशमुख , दत्ता खंडागळे , महादेव रुकमे आदी ग्रामस्थ व शेतकरी बां
अ


लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)भारतीय जनता पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी आज कव्हा गावातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अंबादास देशमुख , दत्ता खंडागळे , महादेव रुकमे आदी ग्रामस्थ व शेतकरी बांधवांशी चर्चा करून त्यांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली.ग्रामस्थांशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. घरांचे व शेतांचे झालेले नुकसान पाहून वेदना झाल्या, पण या संकटाच्या काळात शासन आणि प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, याचा कव्हेकर यांनी विश्वास दिला.शेतकऱ्यांना आवश्यक ती शासकीय मदत तातडीने मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असून, संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande