मुख्यमंत्र्यांनी घेतला बीड जिल्हाधिका-याकडून परिस्थितीचा आढावा
छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीड जिल्हाधिकार्यां कडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील १७ धरणे १०० टक्के भरली असून २ धरणे ही ९० टक्क्यांच्या आसपास भरली आहेत. केवळ माजलगावमधून विसर्
अ


छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीड जिल्हाधिकार्यां कडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.

बीड जिल्ह्यातील १७ धरणे १०० टक्के भरली असून २ धरणे ही ९० टक्क्यांच्या आसपास भरली आहेत. केवळ माजलगावमधून विसर्ग करण्यात येत आहे.

वडवणी तालुक्यात काही गावांचा संपर्क तुटला आहे. तेथे आवश्यक ती मदत पुरविली जात आहे. एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचे पथक बीडमध्ये सज्ज असून, ते बचावकार्य करीत आहेत. सुमारे ४८ मंडळात काल अतिवृष्टी झाली आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून, परिस्थिती उद्भवल्यास त्यांना स्थलांतरित करण्यात येईल. आष्टीमधून ६० नागरिकांना सुरक्षित हलविण्यात आले आहे.

सप्टेंबरपासून २५६७ कुटुंबांना सुरक्षित स्थलांतरित करावे लागले. १० लोकांना प्राण गमवावे लागले. त्यापैकी ८ कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande