लातूर, नांदेड जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना तात्काळ मदतीची खा. शिवाजी काळगे यांची पंतप्रधानांकडे मागणी
लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। अतिवृष्टी व पूरामुळे लातूर, नांदेड जिल्ह्यातील नुकसानबाधितांना तात्काळ मदत करावी, अशी आग्रही मागणी पंतप्रधान यांच्याकडे लातूर नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी पत्राद्वारे केली आहे. माध
अ


लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

अतिवृष्टी व पूरामुळे लातूर, नांदेड जिल्ह्यातील नुकसानबाधितांना तात्काळ मदत करावी, अशी आग्रही मागणी पंतप्रधान यांच्याकडे लातूर नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी पत्राद्वारे केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

लातूर, नांदेड जिल्हे तसेच महाराष्ट्रातील इतर भागात अलीकडे झालेल्या अभूतपूर्व मुसळधार पाऊस व पुरामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थिती आपल्या नजरेमध्ये आणू इच्छितो. या नैसर्गिक आपत्तीमुळे उभी पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेतच, पण सुपीक माती वाहून गेल्यामुळे पिकास उपयुक्त असणारी वरची माती नष्ट झाली आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेले आपले शेतकरी सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. त्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला असून, पिकांचे प्रचंड नुकसान, शेतजमिनींची हानी तसेच शेतीसाठी आवश्यक असणारी पायाभूत सुविधा नष्ट झालेली आहे.

या संकटाच्या प्रसंगी शेतकऱ्यांना भारत सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. म्हणूनच खालील बाबींचा विचार करून आपण तातडीने हस्तक्षेप करण्याची मी आपणांस विनंती करीत आहे.

बाधित शेतकऱ्यांना पिके व जमिनीच्या नुकसानीबद्दल विशेष आर्थिक सहाय्य व मदत पॅकेज उपलब्ध करून द्यावे.

पुरामुळे वाहून गेलेल्या मातीचे मूल्यमापन करून त्यावरील उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारच्या मदत पथकांची व तज्ज्ञांची नेमणूक करावी.

दीर्घकालीन पुनर्वसन उपाययोजनांतर्गत जलसंधारण, मृदा संवर्धन व अशा आपत्तीमध्ये तग धरण्यासाठी पायाभूत सुविधांच्या उभारणी करणे.

वरील अपेक्षित उपाय योजना आपल्या नेतृत्वाखाली येऊन लातूर व नांदेड परिसरातील जनतेचे हाल कमी होतील, असा मला विश्वास आहे. असे ते पत्रात म्हणाले आहेत

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande