लातूर - अतिवृष्टी बाधितांचे पंचनामे सुरू
लातूर, 28 सप्टेंबर, (हिं.स.)। लातूर शहरात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या मालमत्तेला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचली आहे. पालकमंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशासनामार्फत नुकसानग्रस्त भागांची स्थळ
Q


लातूर, 28 सप्टेंबर, (हिं.स.)। लातूर शहरात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या मालमत्तेला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचली आहे. पालकमंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशासनामार्फत नुकसानग्रस्त भागांची स्थळ पाहणी व पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

सध्या प्रभाग क्रमांक 18 येथील पंचनामे सुरू असून पुढील तीन दिवसात शहरातील उर्वरित भागातील पंचनामे पूर्ण केले जाणार आहेत. या प्रक्रियेत भाजपा लातूर शहर जिल्हा संघटनेचे कार्यकर्ते प्रशासनाला सक्रिय सहकार्य करत असून, सर्व बाधित नागरिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण होऊन त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande