जळगाव - अनेक प्रकल्पातून मोठा विसर्ग; नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
जळगाव, 28 सप्टेंबर (हिं.स.) जळगाव जिल्ह्यात विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रात देखील पावसाची संततधार सुरु असून यामुळे धरणातील पाण्याचा साठा वाढला असून यामुळे जिल्ह्यातील मोठे-लहान प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. ज्यामुळे न
जळगाव - अनेक प्रकल्पातून मोठा विसर्ग; नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा


जळगाव, 28 सप्टेंबर (हिं.स.) जळगाव जिल्ह्यात विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रात देखील पावसाची संततधार सुरु असून यामुळे धरणातील पाण्याचा साठा वाढला असून यामुळे जिल्ह्यातील मोठे-लहान प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. ज्यामुळे नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाला. हतनूर, गिरणासह वाघूर या मोठ्या प्रकल्पांसह अनेक लहान प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सकाळी हतनूर धरणाचे ८ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले आहे. तर गिरणा धरणाचे ४ गेट ०.९० मीटरने व दोन गेट ०.६० मीटरने उघडण्यात आले आहे. ज्यामुळे गिरणेला पूर आला आहे. त्याच बरोबर जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे वाघूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सकाळी वाघूर धरणाचे १० दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले आहे. यामुळे वाघूर नदी दुथडी भरून वाहत आहे.

तसेच मन्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मन्याड धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असून मन्याड धरणावरील असलेल्या माणिकपुंज प्रकल्पातून सुमारे 28000 ते 30000 क्युसेक्स वेगाने तसेच पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने मन्याड नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग (येवा) सुरू आहे. सध्या मोर धरणाचे २ गेट ०. २ मीटरने उघडण्यात आले. तर बहुळाचे ७ गेट दीड मीटरने, अंजनीचे ३ गेट ०.२० मीटरने, गूळ धरणाचे ३ गेट ०.५ मी., बोरी धरणाचे ९ गेट ०.१५ मीटरने उघडण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande