वैजापूर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या घरांची पालकमंत्र्यांनी केली पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट वैजापूर येथे येताच पूरग्रस्त भागातील नागरिकांनी त्यांच्याकडे व्यथा मांडल्या. वैजापूर शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या पावसामुळे वैजापूर
अ


छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट वैजापूर येथे येताच पूरग्रस्त भागातील नागरिकांनी त्यांच्याकडे व्यथा मांडल्या. वैजापूर शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीच्या पावसामुळे वैजापूर येथील काही घरांचे मोठे नुकसान झाले असून काही घर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. आज त्या कुटुंबांची शिरसाट यांनी भेट घेऊन त्यांची परिस्थिती जाणून घेतली.

या कठीण प्रसंगी प्रशासन सर्वतोपरी मदतीसाठी त्यांच्या सोबत उभे असून तात्काळ पुनर्वसनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पावसाचा वेग कमी होताच परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रभावित नागरिकांच्या सोबत आपण सारे आहोत, हीच त्यांना दिलासा देणारी हमी आहे.असे पालकमंत्री यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande