छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी महाराज पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जटवाडा येथे रोड रुंदीकरणासाठीचा प्रश्न लवकरच तोडगा काढून निकालात काढला जाईल असं आश्वासन दिले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
जटवाडा परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या रोड रुंदीकरणाच्या समस्येबाबत सर्व नागरिक एकत्र येऊन महानगरपालिका आयुक्त श्रीकांत यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत हा प्रश्न निकाली काढावा अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
यावेळी नागरिकांच्या अडचणी समजून घेत पर्यायी मार्ग काढण्याचे आदेश देण्यात आले तसेच सर्वांना मार्गदर्शन करून समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात आली. जटवाडा परिसरातील सर्वांच्या सहकार्याने हा विकासाचा मार्ग अधिक गतीमान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis