किम्स मानवता हॉस्पिटलतर्फे उत्तर महाराष्ट्रातील अत्याधुनिक कॉम्प्रिहेन्सिव्ह कार्डियाक केअर सेंटरचे लोकार्पण
नाशिक, 28 सप्टेंबर (हिं.स.)। : किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील पहिले व अत्याधुनिक कॉम्प्रिहेन्सिव्ह कार्डियाक केअर सेंटर आज भव्य समारंभात सुरू करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याला नाशिकचे खासदार श्री. राजाभाऊ वाजे प्रमुख पाहुणे
किम्स मानवता हॉस्पिटलतर्फे उत्तर महाराष्ट्रातील अत्याधुनिक कॉम्प्रिहेन्सिव्ह कार्डियाक केअर सेंटरचे लोकार्पण


नाशिक, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

: किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील पहिले व अत्याधुनिक कॉम्प्रिहेन्सिव्ह कार्डियाक केअर सेंटर आज भव्य समारंभात सुरू करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याला नाशिकचे खासदार श्री. राजाभाऊ वाजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सई ताम्हणकर विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

हे अत्याधुनिक हृदय व फुफ्फुस विकार निदान व उपचार केंद्र उत्तर महाराष्ट्रातील हृदयविकार आणि फुफ्फुसांच्या आजारानेग्रस्त रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार असून, जागतिक दर्जाच्या सुविधा व उपचार आता नाशिकमध्येच उपलब्ध होणार आहेत.

या प्रसंगी बोलताना खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, “नाशिक व परिसरातील जनतेसाठी हे कार्डियाक केअर सेंटर म्हणजे वरदानच आहे. आता गंभीर हृदयविकार व फुफ्फुसा च्या उपचारासाठी मुंबई किंवा पुणे येथे जाण्याची गरज भासणार नाही. स्थानिक पातळीवरच तज्ज्ञ डॉक्टर व आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे.”

विशेष पाहुण्या सई ताम्हणकर म्हणाल्या, “नाशिकमध्ये अशा जागतिक दर्जाच्या सुविधा सुरू होत आहेत, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या केंद्रामुळे हजारो रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळणार आहेत.”

या वेळी किम्स मानवता हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक व चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी डॉ. राज नगरकर म्हणाले, कॉम्प्रिहेन्सिव्ह कार्डियाक केअर सेंटर अंतर्गत खालील सेवा उपलब्ध केल्या आहेत. कठीण हृदयशस्त्रक्रिया (Complex Cardiac Surgeries) – बायपास, व्हॉल्व रिपेअर/रिप्लेसमेंट व मिनिमली इन्वेसिव्ह शस्त्रक्रिया. कॉम्प्लेक्स हाय-रिस्क इंडिकेटेड पीसीआय (CHIP) – हाय-रिस्क कोरोनरी आर्टरी डिसीजसाठी प्रगत कॅथेटर आधारित उपचार. इसीएमओ (ECMO) – नवजात बाळांपासून प्रौढांपर्यंत गंभीर रुग्णांसाठी प्रगत लाईफ सपोर्ट. इलेक्ट्रोफिजियोलॉजी स्टडीज (EPS) – हृदयातील अनियमित ठोके व इतर विद्युत तक्रारींवर तज्ज्ञ निदान व उपचार.

पुढे ते म्हणाले, उत्तर महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे आरोग्यसेवा केंद्र देण्याचे आमचे ध्येय आहे. आज हृदयविकार आणि फुफ्फुसाच्या आजाराचे बाबतीत सर्व अत्याधुनिक निदान व उपचार सुविधा एका छताखाली आणून आम्ही नाशिकला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्यसेवेचे हब बनवण्याकडे मोठी पावले टाकली आहेत.”

तसेच हृदय विकार आणि फुफ्फुस विकार या विभागाचे नेतृत्व डॉ. नितीन कोचर (मेडिकल डायरेक्टर व कार्डियाक सायन्सेस विभागप्रमुख), डॉ. यतींद्र दुबे (मेडिकल डायरेक्टर व क्रिटिकल केअर विभागप्रमुख), डॉ. अतुल पाटील, डॉ. निखीलकुमार पटेल, डॉ. अभिनंदन मुथा व डॉ. स्वप्निल साखला यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथक करणार आहे. या केंद्राच्या स्थापनेमुळे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना वेळेत, सुरक्षित व परवडणारे उपचार नाशिकमध्येच मिळणार आहेत. असे याप्रसंगी तज्ञांनी पत्रकार परिषेदत सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande