लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।
किल्लारी कारखान्याची सर्वसाधारण सभा साधेपणाने संपन्न झाली अशी माहिती भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली
किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा आज साधेपणाने संपन्न झाली. श्री निळकंठेश्वराच्या नगरीतील कारखान्याला निळकंठेश्वराचे नाव देण्याचा मानस होता, आजच्या बैठकीत कारखान्याचे नामकरण 'श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना, किल्लारी' असे करण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला.
मागच्या वर्षी ऊसाच्या अनुपलब्धतेमुळे फारसे गाळप केले नाही, यावर्षी ऊस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे आणि कारखान्याची गाळप क्षमताही दुप्पट झाली आहे, त्यामुळे यावर्षी आपण निर्विघ्नपणे 3 लक्ष मेट्रिक टनपेक्षा अधिक गाळप करु असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
किल्लारी कारखाना हा माझ्यासाठी केवळ एक सहकारी तत्त्वावरील उद्योग नाही तर त्याच्याही पुढे जाऊन माझी भावनिक नाळ या कारखान्यासोबत जोडली गेली आहे. असे भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis