लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।
जिल्ह्यात सरासरी 77.42 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. 28 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात सरासरी 19.5 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दि. 1 जूनपासून आतापर्यंतचा पाऊस अपेक्षित पर्जन्यमानाच्या (693.9 मिमी) तुलनेत 915.9 मिमी म्हणजेच 132.0% इतका पाऊस झालेला आहे. लातूर जिल्ह्याची वार्षिक सरासरी (जून ते सप्टेंबर) 706.00 मिमीच्या तुलनेत आजतागायत 915.9 मिमी म्हणजेच 129.7% इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
शोध व बचाव कार्य- अहमदपूर -
मौ. चीलखा बॅरेज 3 मजूर अडकले स्थानिक शोध-बचाव पथकाने सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली.
लातूर-मौ. निवळी येथे एक व्यक्ती पुरात अडकला होता होमगार्ड, आपदा मित्र व पोलिस यांनी त्याची सुखरूप सुटका केली
मौ. हाळी हंडरगुळी 1 महिला पुराच्या पाण्यात अडकली होती. उदगीर स्थानिक शोध-बचाव पथकामार्फत महिलेची सुटका करण्यात आली
मौ. पोहरेगाव येथे मांजरा नदीच्या पुरात 3 मजूर अडकले होते स्थानिक प्रशासनाने त्यांची सुटका केली.
स्थलांतर-
चाकूर - शहर घरांमध्ये पाणी शिरले 57 नागरिकांचे स्थलांतरण; निवारा व जेवण व्यवस्था.
जळकोट - बेळसांगवी गावाला तिरु नदीच्या पुराचा वेढा स्थानिक पाच बचाव पथकामार्फत 400 नागरिकांना यशवंत महाविद्यालय, वाढवणा कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची भोजन व्यवस्था व वैद्यकीय व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे.
शिरूर अनंतपाळ - येथे 125 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.
लातूर - मौ. वासनगाव येथे रामगिरी नगर येथे घरामध्ये पाणी गेलेल्या कुटुंबांतील 40 व्यक्तींना लाल बहादूर शास्त्री विद्यालय येथे स्थलांतरित करून त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली.अहमदपूर - 66 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.
एकंदरीत आठ (8) व्यक्तींची रेस्क्यू करण्यात आले. व एकूण 688 नागरिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्यात आले आहेत.
ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीच्या मदत 3,80,511 शेतकऱ्यांना 244 कोटी इतक्या रकमेची मंजूर मदत वाटपाची कार्यवाही सुरू.
•्नैसर्गिक आपत्तीमुळे मयत 6 व्यक्तींच्या वारसांना रुपये 24 लक्ष मदतीचे वाटप करण्यात आले. पुरामुळे व वीज पडून मयत झालेल्या 162 जनावरांच्या पशुपालकांना मदतीचे वाटप करण्यात आले.
सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानांचे पंचनामे सुरू
एकंदरीत सारांश दिनांक 01 जून पासून 28 सप्टेंबर 2025 पर्यंत-
एकंदरीत आतापर्यंत 62 नागरिकांचा स्थानिक पथकांमार्फत बचाव करण्यात आला. जवळपास 1142 व्यक्ती यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करून तात्पुरते कॅम्पमध्ये त्यांना ठेवण्यात आले.
• आतापर्यंत जवळपास 49 जनावरांची देखील पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात आली.
• मांजरा नदीच्या पुरातून 25 माकडांचे रेस्क्यू करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis