लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.शेतकऱ्यांच्या नुकसानीचा काँग्रेसच्या पक्षपातळीवर अहवाल तयार करणे सुरू असून या दृष्टिकोनातून जिल्ह्यामध्ये सर्व नेते,पदाधिकारी कार्यकर्ते गावोगाव जाऊन माहिती गोळा करत आहेत.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीने नेमलेल्या अतिवृष्टी आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे कासारखेडा महसूल मंडळाचे प्रमुख तथा ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख भैया यांनी नांदगाव,साई,महापूर,बोरवटी व कासारखेडा या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांची भेट घेतली.
गावात झालेल्या नुकसानीची त्यांच्याकडून इत्यंभूत माहिती घेतली.
प्रशासनाच्या सहकार्याने तातडीची मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने युद्धपातळीवर शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पक्षपातळीवर अहवाल तयार करणे सुरू असून या दृष्टिकोनातून जिल्ह्यामध्ये सर्व नेते,पदाधिकारी कार्यकर्ते गावोगाव जाऊन माहिती गोळा करत आहेत.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis