निल्लोड येथील पाझर तलाव क्रमांक एक मधील धरणाच्या भिंतींमधून गळती
छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील निल्लोड मंडळात 115 मिलिमीटर पाऊस झाल्याने येथील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यासोबतच या भागातील सिंचन तलावाचे देखील नुकसान होत आहे. निल्लोड येथील पाझ
अ


छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील

सिल्लोड तालुक्यातील निल्लोड मंडळात 115 मिलिमीटर पाऊस झाल्याने येथील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यासोबतच या भागातील सिंचन तलावाचे देखील नुकसान होत आहे.

निल्लोड येथील पाझर तलाव क्रमांक एक मधील धरणाच्या भिंतींमधून गळती होत असून धरणाच्या भिंतींना भगदाड पडल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

त्या पार्श्वभूमीवर निल्लोड येथे सदरील पाझर तलावाची पाहणी करून याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. तसेच तालुक्यातील तलवाडा, गव्हाली , कायगाव व परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आमदार अब्दुल सत्तार यांनी पाहणी करून आढावा घेतला.

याप्रसंगी तहसीलदार सतीश सोनी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा तायडे, कृउबा समितीचे सभापती विश्वास पा. दाभाडे, संचालक नंदकिशोर सहारे, हनिफ मुलतानी, अक्षय मगर, जमीर मुलतानी, अस्लम शेख आदिंसह गावकरी, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande