नांदेड -आ. प्रताप चिखलीकर यांनी केली पूरग्रस्त भागांची पाहणी
नांदेड, 28 सप्टेंबर (हिं.स.)जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. लोहा, कंधार तालुक्यासह नांदेड जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक गावात पुर परिस्थिती उदभवली काही गावांचे संपर्क तुटले. प्रशासन खबरदारी घेत
अ


नांदेड, 28 सप्टेंबर (हिं.स.)जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. लोहा, कंधार तालुक्यासह नांदेड जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक गावात पुर परिस्थिती उदभवली काही गावांचे संपर्क तुटले. प्रशासन खबरदारी घेत आहे.

कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शासकीय अधिकारी यांच्यासह उदभवलेल्या पूर परिस्थितीची पाहणी केली. लोकांच्या अडीअडचणी सोडविल्या काही ठिकाणी लोकांचे स्थलांतर केले. अजून पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अश्या परिस्थितीत लोहा - कंधारसह जिल्ह्यातील नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये आम्ही सोबत आहोत. काहीही समस्या असेल तर कळवावे असे आवाहन केले. आज सुनेगाव, कंधार, बहादरपुरा, पांगरा, हरसदपाटी या भागात पाहणी करून भेट दिली.

यावेळी एडवोकेट मुक्तेश्वर धोंडगे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर गोरे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, कंधार गट विकास अधिकारी महेश पाटील, लोहा गट विकास अधिकारी कुलकर्णी, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, केशवराव मुकदम यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande