छ. संभाजीनगर : महा. वीज कामगार पतसंस्थेची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र वीज कामगार महासंघ सहकारी पतसंस्था मर्यादित, छत्रपती संभाजीनगर संस्थेची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा राज्याचे ऊर्जा आणि दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या निमित्ताने भव्य
अ


छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र वीज कामगार महासंघ सहकारी पतसंस्था मर्यादित, छत्रपती संभाजीनगर संस्थेची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा राज्याचे ऊर्जा आणि दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

या निमित्ताने भव्य कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सभेत महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या सहकारी पतसंस्थेच्या सभासदांनी पतसंस्थेचा विकास आणखी करावा असे आवाहन सावे यांनी केले.

याप्रसंगी संस्थेतील निवृत्त सभासद व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संस्थेच्या विकासाचा प्रवास आणि कामगारांच्या एकतेचा हा सोहळा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला.

सभेला गणेश दाभाडे, अरुण पिवळे, वसंत काळे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande