छ. संभाजीनगरसह मराठवाड्याच्या काही भागात तुफान पाऊस
छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पावसाचे आगमन झाले कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्हाभरात मुसळधार पावसाचे आगमन झाल्यानंतर पुन्हा एकदा जन जीवन
अ


छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पावसाचे आगमन झाले कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर आला आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्हाभरात मुसळधार पावसाचे आगमन झाल्यानंतर पुन्हा एकदा जन जीवन विस्कळीत झाले आहे.

कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर आल्याने शहराजवळील लंगोटी महादेव मंदिर परिसरात पाणी शिरले.

मंदिरातील पुजारीसह सहा जण आणि तीन लहान मुले अडकली असल्याची माहिती आहे.

पुरातून बाहेर काढण्यासाठी मंदिराचे व्यवस्थापक दिलीप गिरी यांची मदतीची मागणी केली.

धाराशिवमध्ये मुसळधार पावसाचा जिल्हापरिषद शाळांना मोठा फटका बसला जिल्ह्यातील 78 शाळांमधील 125 वर्गखोल्यांची पडझड झाली

धाराशिव मध्ये मुसळधार पावसाचा जिल्हापरिषद शाळांना मोठा फटका बसला आहे.

जिल्ह्यातील 78 शाळांमधील 125 वर्गखोल्यांची पडझड झाली आहे

130 शाळेतील 387 वर्गखोल्याचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे 25 शाळेत पाणी शिरल्याने साहित्य व पोषण आहार भिजला , दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शिक्षण विभागाची माहिती हाती आली.

वैजापूर तालुक्यातील दोन ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात येणार आहे गाड्या तिकडे रवाना करण्यात आले आहेत.

बाबुळगाव खुर्द- 14ते 15 लोक अडकल्याची शक्यता आहे.

भिवगाव येथे 10 लोकं अंदाजित

खुलताबाद तालुका:

बाजार सावंगी या गावात दहा ते पंधरा लोक अडकल्याची माहिती

दोन्हीकडे दोन वेगवेगळे शोध व बचाव पथके आवश्यक साहित्य पाठविण्यात आली आहेत

हिंगोली जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून सातत्याने मुसळधार पाऊस

हिंगोली जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला महापूर आल्याचा पाहायला मिळते आहे कळमनुरी तालुक्यातील कोंढुर गावामध्ये पाणी शिरल्याने सगळीकडे दाणादाण उडाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande