परभणी : गोदावरी नदी पात्रात एक लाख 41 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू
परभणी, 28 सप्टेंबर (हिं.स.)। जायकवाडी प्रकल्पातील नाथसागर जलाशयातून द्वार क्र १० ते २७ असे एकूण १८ (नियमित द्वार) दरवाजे ०.५ फूट उचलून ५.५ फूट पर्यंत उघडण्यात आले असून गोदावरी नदी पात्रात ९४३२ क्युसेक इतका विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सांडव्या
परभणी : गोदावरी नदी पात्रात एक लाख 41 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू


परभणी, 28 सप्टेंबर (हिं.स.)। जायकवाडी प्रकल्पातील नाथसागर जलाशयातून द्वार क्र १० ते २७ असे एकूण १८ (नियमित द्वार) दरवाजे ०.५ फूट उचलून ५.५ फूट पर्यंत उघडण्यात आले असून गोदावरी नदी पात्रात ९४३२ क्युसेक इतका विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात एकूण १८ (नियमित) व ०९ (आपत्कालीन) गेटमधून १३२०४८ + ९४३२ = १४१४८० क्युसेक विसर्ग सुरू राहील. आवक लक्षात घेऊन विसर्गात वेळोवेळी वाढ अथवा घट करण्यात येईल. नदीकाठच्या जनतेने सतर्क रहावे. असे आवाहन पैठण येथील जायकवाडीच्या पूर नियंत्रण कक्षाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande