पैठण बाजार समितीचा अ वर्गात समावेश
छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। माहेश्वरी भक्तनिवास, पैठण येथे कृषी उत्पन्न बाजार समिती, पैठणची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शिवसेना आमदार विलास भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व सभापती श्री. राजू नाना भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरीत
अ


छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

माहेश्वरी भक्तनिवास, पैठण येथे कृषी उत्पन्न बाजार समिती, पैठणची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शिवसेना आमदार विलास भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व सभापती श्री. राजू नाना भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरीत्या पार पडली.

खासदार श्री. संदिपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीने राज्यस्तरावर उल्लेखनीय प्रगती साधली असून शेतकऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आगामी काळात उपबाजारांचा विस्तार, शेतकरी भवन, तसेच व्यापारी संकुल उभारणी यांसारखे अनेक विकासात्मक प्रकल्प राबवले जाणार असल्याचे आश्वासन या निमित्ताने देण्यात आले.

सभापतींनी आपल्या प्रस्तावनेत बाजार समिती राज्यातील “अ वर्ग बाजार समिती” मध्ये समाविष्ट झाली असून, सातत्याने नफ्यातील संस्था असल्याचे नमूद केले.

यावेळी सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी, शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच पाचोड येथील कृषी पणन मंडळाचे फळे व भाजीपाला निर्यात सुविधा केंद्र लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू होणार असल्याची घोषणा देखील यावेळी केली.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande