रायगडमध्ये अवैध धंद्यांवरून संतापाचा उद्रेक
रायगड, 28 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींनी नटलेल्या रायगड जिल्ह्याच्या लेडीज बारसारखे प्रकार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे तरुणाई नशेच्या आहारी जाऊन बरबाद होत असल्या
तरुणाईच्या भवितव्याशी खेळ? रायगडमध्ये अवैध धंद्यांवरून संतापाचा उद्रेक


रायगड, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींनी नटलेल्या रायगड जिल्ह्याच्या लेडीज बारसारखे प्रकार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे तरुणाई नशेच्या आहारी जाऊन बरबाद होत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आले असून, महामार्गालगत असलेला समुद्र लेडीज बार हा रात्री उशिरापर्यंत सुरू राहतो. या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता कायम असते. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे या बारमध्ये महिलांशी संबंधित अनैतिक प्रकार होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत.

या परिस्थितीचा तीव्र निषेध व्यक्त करत स्वराज्य संविधान रक्षक सेना (पॅंथर आर्मी) यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. या सर्व अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल, असे निवेदन खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल वसंत नेहुल यांना देण्यात आले.

संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जर हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद झाले नाहीत, तर त्यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार असेल.”या वेळी संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष पँथर आशिष भाई खंडागळे, जिल्हा सचिव पँथर आदित्य भाई कदम, तालुका उपाध्यक्ष भूषण भाई गायकवाड आणि तालुका संघटक मंगेश भाई शेंडे उपस्थित होते. पवित्र रायगड जिल्ह्यातील युवकांचे भवितव्य सुरक्षित राहावे यासाठी या धंद्यांना पूर्णविराम देणे आवश्यक असल्याचे सर्वांनी मत व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande