पुणे विद्यापीठाची क्रमवारी घसरल्याबाबत ३० सप्टेंबरच्या अभिसभेत चर्चा
पुणे, 28 सप्टेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन आराखड्यात (एनआयआरएफ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान घसरल्याचे पडसाद विद्यापीठाच्या अधिसभेत उमटतील. क्रमवारीतील विद्यापीठाच्या घसरणीबाबत अभिसभा सदस्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले असू
University Pune SPUU


पुणे, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन आराखड्यात (एनआयआरएफ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान घसरल्याचे पडसाद विद्यापीठाच्या अधिसभेत उमटतील. क्रमवारीतील विद्यापीठाच्या घसरणीबाबत अभिसभा सदस्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले असून, घसरणीची कारणे शोधण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्याचा ठराव मांडण्यात आला आहे.

विद्यापीठाची अधिसभा 3० सप्टेंबर रोजी आयोजिण्यात आली आहे. यात विविध प्रशासकीय, आर्थिक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. त्यासाठीची कार्यक्रम पत्रिका अंतिम करण्यात आली असून, त्यानुसार एनआयआरएफ क्रमवारीत विद्यापीठाचे स्थान ३७व्या क्रमांकावरून ९१व्या स्थानापर्यंत घसरल्याबाबतची चर्चा केली जाणार आहे. अधिसभा सदस्य डॉ. अपर्णा लळिंगकर, दादाभाऊ शिनलकर, राहुल पाखरे यांच्यासह अनेक सदस्यांनी या विषयावर ठराव मांडले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande