सोलापूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।
सीना नदीच्या पूरस्थिती नंतर आता त्या पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याने सोलापूरच्या सोनाई फाउंडेशनने आपला हातभार म्हणून आरोग्य शिबिर आयोजित केले आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड, आहेरवाडी, वांगी तसेच नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेल्या मंद्रूप भागात आरोग्य शिबिर घेण्यात आली आहेत. सोनाई फाउंडेशनने आपल्या आधार क्रिटिकल सेंटर या हॉस्पीटलच्या वतीने हे शिबिर घेतले असून सर्व नागरिकांची तपासणी केली जात आहे, त्यांना त्याच ठिकाणी आवश्यक औषधोपचार करण्यात येत आहे.
तसेच गावोगावी फिरून सुद्धा नागरिकांची तपासणी सुरू आहे. या मोफत शिबिरा बद्दल सोनाई फाउंडेशनने युवराज राठोड आणि आधार हॉस्पिटलचे डॉ योगेश राठोड यांचे पूरग्रस्त आभार व्यक्त करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड