नांदेड - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित श्री विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव संपन्न
नांदेड, 28 सप्टेंबर, (हिं.स.)। आज नांदेड येथील महाराणा प्रतापसिंह नगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित श्री विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव संपन्न झाला. या पावन प्रसंगी स्वयंसेवकांच्या अनुशासित पथसंचलनात तरुणाईसह लहान मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग हो
नांदेड - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित श्री विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव संपन्न


नांदेड, 28 सप्टेंबर, (हिं.स.)।

आज नांदेड येथील महाराणा प्रतापसिंह नगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित श्री विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव संपन्न झाला.

या पावन प्रसंगी स्वयंसेवकांच्या अनुशासित पथसंचलनात तरुणाईसह लहान मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता

संघाची शिस्त, देशभक्ती आणि राष्ट्रनिष्ठेची परंपरा हीच खरी प्रेरणा आहे.शस्त्रपूजनाचा सोहळा म्हणजे केवळ परंपरेचा गौरव नव्हे, तर शौर्य, संयम, आत्मबल व राष्ट्रसेवेची शपथ यांचे प्रतीक आहे.

विजयादशमीचा हा उत्सव आपल्याला सदाचार, पराक्रम आणि सत्यनिष्ठा या जीवनमूल्यांना अधिक दृढ करण्याची शिकवण देतो. हा सोहळा केवळ उत्सव नसून—राष्ट्रभक्तीच्या संस्कारांचे आणि अखंड भारताच्या स्वप्नाचे नवसंजीवन आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande