शेतकऱ्यांना रेणा साखर कारखाना ३१५० रु. प्रति मेट्रिक टन देणार दर
लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील रेणा साखर कारखाना गाळप हंगामात उसाला ३१५० रुपये प्रति मेट्रिक टन दर देण्याची घोषणा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केली. दिलीपनगर निवाडा येथील रेणा सहकारी साखर कारखान्याच्या २३ व्या वार्षिक सर्वसाध
अ


लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील रेणा साखर कारखाना गाळप हंगामात उसाला ३१५० रुपये प्रति मेट्रिक टन दर देण्याची घोषणा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केली.

दिलीपनगर निवाडा येथील रेणा सहकारी साखर कारखान्याच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत देशमुख बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ शिवाजीराव काळगे,जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार धीरज विलासराव देशमुख, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख व्हॉईस चेअरमन अँड प्रवीण पाटील, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार वैजनाथजी शिंदे,राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील रेणा आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की राज्यात एकीकडे साखर कारखाने अजूनही शेतकऱ्यांचे पैसे एफआरपी देत नाहीत. शेतकरी आंदोलन करीत आहे असे चित्र दिसत असताना आपल्या लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवारातील साखर कारखाने सर्वाधिक उसाला भाव देवुन एफ आर पी सहित रक्कम देवुन शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहून संस्था कार्य करीत असून त्यामुळे राज्यात मांजरा साखर परिवाराचा नावलौकिक प्राप्त झालेला आहे असे सांगून परिवारातील संस्थांचे १५० हरवेस्टर स्वतः च्या मालकीचे असून संस्था अधिक भाव देवुन शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुबत्ता देण्याचे काम मांजरा परिवार करत आहे. आम्ही विकासाचे सूत्र हातात घेतलेले आहे. राजकारण हे व्यवसाय नाही ही पांडुरंगाच्या वारी आहे त्यामुळे या वारीला आम्ही जाणार असेही ते यावेळी म्हणाले.

रेणा साखर कारखान्याचे यावर्षी ७.५०लाख मेट्रिक टन उसाचे गाळप उद्दिष्ट ठेवली असल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच रेणा साखर कारखाना आगामी काळात ७.५० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ठ ठेवले असून त्यासाठी सर्व यंत्रणा तत्पर सेवेत राहील यासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

रेणा साखर कारखान्याकडून सामजिक दायित्व म्हणून सहकार महर्षी दिलीपराव देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका केंद्रातून जवळपास ४ हजार विद्यार्थी लाभ घेत आहेत त्यातून अनेक विद्यार्थी सरकारी नोकरी करीत आहेत अनेक जन शैक्षणिक सुविधेचा लाभ घेत आहे यांचाही उल्लेख करत शेतकऱ्यांच्या मदतीला परिवार कायम उभा राहील अशी ग्वाही देशमुख यांनी दिली.

----------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande