कोल्हापूर - 'स्मॅक'ची सुवर्णमहोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
कोल्हापूर, 28 सप्टेंबर, (हिं.स.)| शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर (स्मॅक) च्या सुवर्णमहोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा स्मॅकचे चेअरमन राजू पाटील यांच्या अध्यक्षते खाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दा
'स्मॅक' सर्वसाधारण सभा


कोल्हापूर, 28 सप्टेंबर, (हिं.स.)| शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर (स्मॅक) च्या सुवर्णमहोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा स्मॅकचे चेअरमन राजू पाटील यांच्या अध्यक्षते खाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दास ऑफशोअर प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन व एमडी, उद्योजक डॉ. अशोक डी. खाडे उपस्थित होते.

आपल्या प्रभावी मुलाखतीत त्यांनी स्मॅक आयटीआयमधून पासआऊट होणाऱ्या वेल्डर व इलेक्ट्रिशन विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. वेल्डिंग आणि इलेक्ट्रिकल क्षेत्रात आमच्या उद्योग समूहात विद्यार्थ्यांना संधी देऊ तसेच भविष्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना जोडून औद्योगिक विकास साधता आय. टी. आणि ए. आय. च्या क्षेत्रातील संबंधित कंपन्यांशी समन्वय साधून भरीव योगदान देण्याची ग्वाही दिली.आणखी कोणत्या संधी निर्माण करता येतील, यासाठी आपण एकत्र बसून चर्चा करू, असे ते म्हणाले.

प्रास्ताविक व मनोगत स्मॅक चे चेअरमन राजू पाटील यांनी केले.

तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अतुल पाटील यांनी करून दिला. सभेत स्मॅक आयटीआयचा वार्षिक अहवाल प्रशांत शेळके, अध्यक्ष यांनी सादर केला, तर स्मॅक क्लस्टरचा अहवाल सुरेश चौगुले, अध्यक्ष यांनी मांडला. मागील सभेच्या प्रोसीडिंग्ज वाचनाचे काम मॅनेजर यांनी पार पाडले. सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी प्रमुख पाहुणे डॉ. खाडे यांच्यासह चेअरमन राजू पाटील, चेअरमन भरत जाधव, ऑ. सेक्रेटरी शेखर कुसाळे आणि खजानिस बदाम पाटील उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande