छत्रपती संभाजीनगर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।
सिल्लोड तालुक्यातील अन्वी येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर गोपाल भवर यांचे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे ३५ तोळे सोन्याची दागिने व १३ लाख रुपये रोख रक्कम असा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.
या पार्श्वभूमीवर अन्वी गावात आज आमदार अब्दुल सत्तार यांनी भेट देवून भवर परिवाराची भेट घेतली. घडलेल्या घटनेची पाहणी करून माहिती घेतली. पोलीस प्रशासन तसेच गावकऱ्यांशी संवाद साधला. पोलीस घटनेचा तपास करीत असून लवकरच गुन्हा उघडकीस आणेल त्यामुळे भवर परिवार व गावकऱ्यांनी धीर धरावा असे आवाहन केले.
याप्रसंगी तहसीलदार सतीश सोनी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, एपीआय रवींद्र ठाकरे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार आदी अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis