पाथरी शहरातील समस्या सोडवा; शिवसेना अल्पसंख्याक विभागाचा नगरपरिषदेला इशारा
परभणी, 28 सप्टेंबर (हिं.स.)।पाथरी नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या विविध मूलभूत समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करत शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गु
शिवसेना अल्पसंख्याक विभागाचा नगरपरिषदेला इशारा


परभणी, 28 सप्टेंबर (हिं.स.)।पाथरी नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या विविध मूलभूत समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करत शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गुठ्ठे अध्यक्षस्थानी होते.

नागरिकांच्या समस्यांकडे गंभीरपणे लक्ष द्या तसे शहरातील रस्ते, नाले, वीज, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, शासकीय योजनांचे लाभ, तसेच स्वच्छता यांसारख्या तातडीच्या प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांचा मूलभूत हक्क अबाधित ठेवण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने गंभीरपणे लक्ष द्यावे, अशी मागणी बैठकीतून जोरदारपणे पुढे आली.

यावेळी शहरातील रस्ते व नाल्यांची नियमित साफसफाई करावी. विद्युत पोल व वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. राष्ट्रीय महामार्गावरील सर्व दिवे कार्यरत ठेवावेत.प्रधानमंत्री आवास व रमाई घरकुल योजनेंतील प्रलंबित लाभार्थ्यांना मंजुरी द्यावी. नगरपरिषदेत अतिरिक्त कर्मचारी तातडीने नियुक्त करावेत. घनकचरा गाड्यांचे योग्य नियोजन करून अडथळे दूर करावेत. पाणीपुरवठ्यातील अडचणी त्वरित सोडवाव्यात. स्वच्छता कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणी व सुविधा पुरवाव्यात. दसरा मैदान व शहरातील प्रमुख रस्त्यांची स्वच्छता करावी.या बैठकीस नगरपरिषदेचे कर्मचारी तसेच माजी नगराध्यक्ष मुंजाजी भाले , माजी नगरसेवक युसुफद्दीन अन्सारी, माजी नगरसेवक अलोक चौधरी, माजी नगरसेवक लालू खान, सुनंदाताई फलके तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक व पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande