सोलापूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विकासात्मक दृष्टीकोन आणि एकात्मतेवर आधारित राष्ट्रवादीची वाटचलीवर आकर्षित होऊन सोलापूर शहरातील काँग्रेस पक्षाचे माजी सभागृह नेते हाजी मकबूल मोहळकर, माजी नगरसेवक सिद्धेश्वर आळंदकर, काँग्रेसचे माजी परिवहन सभापती सलिम पामा, काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष नजीब शेख, न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष भारत साबळे मगबुल मोहळकर यांचे चिरंजीव ॲड. ताजुदीन मोहळकर याच्यासह अनेक मान्यवरांनी मुंबई येथील महाराष्ट्र महीला विकास मंडळ सभागृहात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
सोलापुरात अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष नजीब शेख यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देत काँग्रेस पक्ष सोडला होता. त्यानंतर बरेच दिवस ते वेट अँड वॉच मध्ये दिसून आले. दरम्यान अचानक त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबतच माझे सभागृहनेते मकबूल मोहोळकर त्यांचे चिरंजीव ताजुद्दीन मोहोळकर काँग्रेसचे माजी परिवहन सभापती सलीम पामा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ हातावर बांधले आहे. यावरून काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांमध्ये अजित पवारांचे क्रेज वाढल्याचे पाहायला मिळते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड