रेल्वेच्या असिस्टंट लोको पायलट तेजस्वी हंकारे 'नांदेडची नवदुर्गा' म्हणून सन्मानित
- भाजपा आ. श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते झाला सन्मान नांदेड, 28 सप्टेंबर (हिं.स.)नवरात्रीच्या निमित्ताने शिवाजीनगर, नांदेड येथील श्री नवयुवक दुर्गामाता मंडळात ''नमस्ते नांदेड''च्या वतीने भारतीय रेल्वेच्या असिस्टंट लोको पायलट तेजस्वी हंकारे यांन
अ


- भाजपा आ. श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते झाला सन्मान

नांदेड, 28 सप्टेंबर (हिं.स.)नवरात्रीच्या निमित्ताने शिवाजीनगर, नांदेड येथील श्री नवयुवक दुर्गामाता मंडळात 'नमस्ते नांदेड'च्या वतीने भारतीय रेल्वेच्या असिस्टंट लोको पायलट तेजस्वी हंकारे यांना 'नांदेडची नवदुर्गा' म्हणून सन्मानित करण्यात आले.

महिन्याभरापूर्वी नांदेड ते मुंबई दरम्यान धावलेल्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या त्या सहचालक होत्या. त्यांनी निवडलेले क्षेत्र आणि त्यांची कर्तव्यनिष्ठा प्रेरणादायी असल्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला.

नवयुवक दुर्गामाता मंडळाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.भोकर विधानसभा मतदारसंघााच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार श्री जया चव्हाण यांच्या हस्ते भारतीय रेल्वेच्या असिस्टंट लोको पायलट तेजस्वी हंकारे यांना'नांदेडची नवदुर्गा' म्हणून सन्मानित करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande