नाशिक, 28 सप्टेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसाने आत्तापर्यंत तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर दोन जखमी झाले आहेत. याशिवाय 248 कुकुट पक्षांचा मृत्यू झाला आहे तर 135 घरांमध्ये पाणी शिरला आहे 139 घरांचं अंशतः नुकसान झाले आहे. सुरू असलेल्या पावसामुळे नासिक आपदा कक्षाच्या वतीने कोपरगाव येथे नागरिकांची सुटका करण्यासाठी एका पथकाची रवानगी करण्यात आलेली आहे.
शनिवारी बदललेल्या हस्ता नक्षत्राच्या पावसाने शनिवारी सायंकाळपासूनच नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदीपात्र हे धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसाने निफाड तालुक्यातील मुखेड येथे सभा मंडप आणि जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडून गेले आहेत या बरोबरीने नाशिक जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या वतीने शेजारी असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे पाण्यामध्ये अडकलेल्या सहा व्यक्तींची सुटका करण्यासाठी चार आपला मित्र आणि तीन नाशिक मनपाच्या अग्निशमन कर्मचाऱ्याचे विशेष पथक हे पाठविण्यात आले आहे त्या ठिकाणी या पथकाच्या माध्यमातून मदत आणि बचाव कार्य सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील येवला तालुक्यामध्ये 13 अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्यात आली आहे याशिवाय या तालुक्यांमध्ये दोन वृद्ध देखील अडकले होते त्यांची देखील सुटका करण्यात आलेली आहे. नाशिक तालुक्यातील लाखलगाव या ठिकाणी दोन काही या पाण्यामध्ये अडकल्या होत्या त्यांची सुटका करण्यात आलेली आहे तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दावलेश्वर या ठिकाणी सहा जण अडकले होते त्यांची देखील आपत्ती निवारण कक्षाच्या पथकाने सुटका केलेली आहे
जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यामध्ये एकूण तीन व्यक्ती मृत झालेल्या आहेत दोन व्यक्ती जखमी झालेले आहेत आठ मोठी दुगाळ जनावरे आणि 22 लहान जनावरे यांच्यासह 248 कुकुट पक्षांचा मृत्यू झालेला आहे 129 कच्ची घरांचं अंशतः तर सात घरांचा पूर्णतः नुकसान झालेले आहेत 135 नागरिक हे नांदगाव तालुक्यात घरामध्ये पाणी शिरल्यामुळे अडकून पडलेले होते त्यांची देखील सुटका करण्यात आलेली आहे 15 झोपड्या नष्ट झालेल्या आहेत तर एक गाईचा गोठा देखील नष्ट झाल्याची प्राथमिक माहिती रविवारी सायंकाळी पर्यंत प्रशासनाकडे उपलब्ध झालेली होती यामध्ये निफाड त्रंबकेश्वर नांदगाव चांदवड मालेगाव या तालुक्यांच्या बरोबरीनेच जास्त नुकसान झालेले बागलाण सुरगाणा कळवण पेठ या तालुक्यांचा समावेश आहे या ठिकाणी प्राथमिक पंचनामे करण्यात येत असून पुढील पावले प्रशासनाकडून उचलली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये एकूणच पावसामुळे होत असलेल्या परिस्थितीवरती जिल्हाधिकारी जिल्हा शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी रोहित रजपुत, आपत्ती निवारण अधिकारी देशपांडे, त्यांच्याबरोबर अनेक इतर प्रशासकीय यंत्रणा देखील लक्ष ठेवून आहेत
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV