पालघर - आदिवासी एकता मित्र मंडळाला ‘श्री गणराया पुरस्कार २०२५’मध्ये प्रथम क्रमांक
पालघर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। आदिवासी एकता मित्र मंडळ, धुपोंडा पाडा शाखेच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी उत्कृष्ट नियोजन आणि समाजोपयोगी उपक्रमांमुळे मनोर पोलिस ठाणे क्षेत्रातील “श्री गणराया पुरस्कार २०२५”चा पहिला क्रमांक पटकावला. मंडळाने गणेश
मनोरमधील धुपोंडा पाडा शाखेच्या आदिवासी एकता मित्र मंडळाला ‘श्री गणराया पुरस्कार २०२५’मध्ये प्रथम क्रमांक


पालघर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। आदिवासी एकता मित्र मंडळ, धुपोंडा पाडा शाखेच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी उत्कृष्ट नियोजन आणि समाजोपयोगी उपक्रमांमुळे मनोर पोलिस ठाणे क्षेत्रातील “श्री गणराया पुरस्कार २०२५”चा पहिला क्रमांक पटकावला.

मंडळाने गणेशोत्सवात “ऑपरेशन शिंदूर” या देशभक्ती जागवणाऱ्या देखाव्यासोबतच महापुरुषांचे सुविचार, वारली पेंटिंगचे भित्तीलेखन, तसेच विविध समाजोपयोगी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. मिरवणुकीत डीजेचा वापर न करता पारंपरिक बँडचा समावेश केला. विसर्जनावेळी ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊ नये यासाठी स्वयंसेवकांकडून दोरी व योग्य नियोजन करण्यात आले. व्यसनमुक्तीचा संदेशही मंडळाकडून प्रभावीपणे देण्यात आला.

या सर्व बाबींचा विचार करून मंडळाला श्री गणराया पुरस्कार २०२५मध्ये पहिला क्रमांक प्रदान करण्यात आला. मंडळाच्या वतीने आकाश जनाठे, अविनाश जनाठे, मुकेश राजभर आणि श्री. रोहन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मनोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रणवीर बयेस, मेजर प्रधाने तसेच पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande