भारताच्या पंतप्रधानांचे त्रिनिदाद-टोबैगोच्या पंतप्रधानांनी मानले आभार
पोर्ट ऑफ स्पेन , 28 सप्टेंबर (हिं.स.)। त्रिनिदाद आणि टोबैगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांनी उघड केले की, भारताने त्यांच्या देशाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्य
त्रिनिदाद-टोबैगोच्या पंतप्रधानांनी मोदींचे मानले आभार


पोर्ट ऑफ स्पेन , 28 सप्टेंबर (हिं.स.)। त्रिनिदाद आणि टोबैगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांनी उघड केले की, भारताने त्यांच्या देशाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये जागा मिळवण्यासाठी दिलेला पाठिंबा खूप मोलाचा ठरला.

कमला प्रसाद-बिसेसर यांनी सांगितले की, “भारताने आम्हाला यूएन सुरक्षा परिषदेमध्ये जागा मिळवण्यासाठी पाठिंबा दिला. त्या काळात कोणत्याही देशाकडून आमच्या विरोधात काहीही ऐकायला मिळाले नाही. अनेक देश आमच्यासोबत होते आणि आम्ही भारतासोबत एकत्र येऊन भविष्यातही याच दिशेने काम करण्यास उत्सुक आहोत.”

कमला प्रसाद-बिसेसर यांनी पंतप्रधान मोदींचे खासकरून ‘दक्षिण-दक्षिण सहकार्य’ वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी म्हटले, “आम्ही पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करतो. त्यांनी केवळ भारतासाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी विशेषतः दक्षिणेकडील देशांसाठी खूप मोलाचे योगदान दिले आहे. आजवर जगात प्रामुख्याने उत्तर देशांचे वर्चस्व राहिले आहे, परंतु मोदींनी दक्षिण देशांना एकत्र आणून त्यांना सशक्त करण्याचे कार्य केले आहे.”

त्यांनी हेही सांगितले की, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अलीकडील दौऱ्यात ब्राझील आणि घाना यांसारख्या दक्षिणेकडील देशांना भेटी दिल्या आणि भारतीय प्रवासी समुदायाशी संवाद साधला.

मोठ्या कार्यक्रमांमध्ये प्रवासी भारतीयांना आमंत्रित केले गेले, ज्यामुळे त्यांचा भारताशी संबंध अधिक दृढ झाला. या दौऱ्याच्या माध्यमातून भारत आणि त्रिनिदाद यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होईल. मोदींच्या दौऱ्याने फक्त आर्थिक संबंध नव्हे, तर मानवीय सहकार्यालाही एक नवी दिशा मिळाली आहे.

त्यांनी जयपूर फूट यूएसए आणि ब्रुहुद न्यू यॉर्क सीनियर्स यांच्या सहकार्याने त्रिनिदादमध्ये पाच दिवसांचे कृत्रिम पाय लावण्याचे शिबिर घेण्यात येणार असल्याचे सांगितले. या शिबिरात गोरगरीब आणि गरजू लोकांना विनामूल्य कृत्रिम पाय दिले जातील, ज्यामुळे समाजातील कमकुवत घटकांना थेट फायदा होणार आहे. पुढे त्यांनी प्रेम भंडारी यांच्या योगदानाबद्दल विशेष आभार मानले. “मी प्रेम भंडारी यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी या उपक्रमाचा मानवीय दृष्टीने व्याप्ती वाढवली आहे. हा एक महत्वाचा सामाजिक उपक्रम आहे, जो हजारो लोकांचे आयुष्य बदलून टाकणार आहे.”

शेवटी कमला प्रसाद-बिसेसर म्हणाल्या, “ही फक्त एक दौऱ्याची घटना नव्हती, तर भविष्यातील सामायिक समृद्धीची पायाभरणी करणारा ऐतिहासिक टप्पा होता. याचा परिणाम येत्या अनेक वर्षांपर्यंत जाणवत राहील.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande