जळगाव, 28 सप्टेंबर (हिं.स.) तालुक्यातील भोकर गावात राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरूणाला विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दत्तू दिलेरसिंग बारेला वय २१ रा. भोकर ता. जळगाव असे मयत झालेल्य तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भोकर गावात दत्तू बारेला हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता.शनिवारी (२७ सप्टेंबर) त्याचे आईवडील व बहिण हे शेतात कामासाठी गेले होते. त्यावेळी दत्तू हा घरी एकटाच होता. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तो ईलेक्ट्रीक वायर जोडत असतांना त्याचा अचानक विजेचा धक्का बसला, त्यात तो जागीच ठार झाला. तरुणाचे आईवडील सायंकाळी घरी आले तेव्हा हा प्रकार समोर आला. त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषीत केले. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई वडील, बहिण आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर