लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।
लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणापूरची ग्रामदेवता श्री रेणुका मातेची लातूर येथील रेणुका करियर सेंटरचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी पहाटे ४ वाजता सपत्निक व परिवारासमवेत उपस्थित राहून महापूजा केली.विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी माता रेणुकेसमोर प्रार्थना केली. तसेच अलीकडील पूरस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या बांधवांना या संकटातून मुक्त होऊन सुख-समाधान लाभावे यासाठीही देवीचे साकडं घालून आशीर्वाद मागितले.
शारदीय नवरात्र उत्सवामुळे मोटेगावकर परिवारातर्फे भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पंचमी असल्यामुळे दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.सर्वांना भक्तिभाव, समाधान आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा अनुभव लाभला.
माता रेणुकेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आणि संपूर्ण वातावरणात श्रद्धा, आनंद व भक्तीचा उत्साह पसरला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis