सोलापुरात रात्रभर पावसाची जोरदार हजेरी; देगाव मध्ये घुसले घरात पाणी
सोलापूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापुरात दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला होता त्याप्रमाणे मागील दोन दिवस रात्रीच्या सुमारास आणि दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे आता पुन्हा सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. हिप्परगा तलावातू
सोलापुरात रात्रभर पावसाची जोरदार हजेरी; देगाव मध्ये घुसले घरात पाणी


सोलापूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

सोलापुरात दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला होता त्याप्रमाणे मागील दोन दिवस रात्रीच्या सुमारास आणि दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे आता पुन्हा सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत आहे.

हिप्परगा तलावातून पुन्हा सांडवा सुटल्याने आदीला नदी दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे पुन्हा शहरात पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे मंगळवेढा रोडवरील शहरालगत असलेल्या देगाव मध्ये ओढ्याला पूर आल्याने ते पाणी लोक वस्तीमध्ये घुसले आहे सध्या देगाव मध्ये गुडघाभर पाण्यात लोकांचे घर पाहायला मिळत आहेत.

या भागाचे लोकप्रतिनिधी शिवसेना नेते गणेश वानकर यांनी परिस्थितीची पाहणी करत महापालिकेला मदतीसाठी प्राचारण केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande