अमरावती : अतिवृष्टीग्रस्त भागाची काँग्रेस समितीकडून माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात पाहणी
अमरावती, 29 सप्टेंबर (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी समिती प्रमुख माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील समितीचा दौरा पार पडला. सकाळी १० वाजता समितीचे प्रमुख व सदस्य अमरावती येथील शासकीय विश्राम
अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता काँग्रेसची विभागीय समिती जिल्हात   समिती प्रमुख माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात पाहणी


अमरावती, 29 सप्टेंबर (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी समिती प्रमुख माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील समितीचा दौरा पार पडला. सकाळी १० वाजता समितीचे प्रमुख व सदस्य अमरावती येथील शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. यानंतर सकाळी ११ वाजता अंतोरा येथील शेतकरी नामदेवराव शामराव पाटील व दिवाकर ससाणे यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी करण्यात आली. त्यानंतर ११:३० वाजता समितीने दिलीपराव सोनोने यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. या पाहणी दौऱ्यात समिती प्रमुख माणिकराव ठाकरे, खासदार बळवंतराव वानखडे,जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख,माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, हरिभाऊ मोहोड, तसेच प्रकाशराव काळबांडे,प्रवीण मनोहर,संजय नागोणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समिती सदस्यांनी शेतकऱ्यांची आस्थेने चौकशी केली, पिकांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून त्यांना धीर दिला. “शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, हेक्टरी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये नुकसान भरपाईची मागणी देखील यावेळी काँग्रेसकडून शासनाकडे केली जाणार आहे ,शासनाने याची दखल न घेतल्यास आम्ही रस्त्यावर उतरून लढा देण्यास तयार आहोत,” असा इशारा खासदार बळवंतराव वानखेडे व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी यावेळी दिला. या दौऱ्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून शासनाने योग्य त्या पातळीवर त्वरीत मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande