भाजप आ. अनुराधा चव्हाण फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर
छत्रपती संभाजीनगर, 29 सप्टेंबर (हिं.स.)। अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांची थेट बांधावर जाऊन फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भाजपचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी भेट घेतली व महायुती सरकार करत असलेल्या सहकार्याबद्दल आश्वस्त केले. फुलंब्री ताल
अ


छत्रपती संभाजीनगर, 29 सप्टेंबर (हिं.स.)।

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांची थेट बांधावर जाऊन फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भाजपचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी भेट घेतली व महायुती सरकार करत असलेल्या सहकार्याबद्दल आश्वस्त केले.

फुलंब्री तालुक्यात सरासरी १२० मिमी पाऊस झाल्यामुळे अनेक गावांतील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गणोरी, पिंपळगाव गांगदेव, शेवता, वडोद बाजार व पाल या गावांचा दौरा करून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. तसेच गिरीजा नदीकाठच्या गावांतील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली.

गिरीजा, फुलंब्री व वाकोद प्रकल्प भरल्यामुळे गिरीजा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून, शेवता येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे गेट बंद झाल्यामुळे बाजूच्या शेतीवर संकट निर्माण झाले आहे. या भागाची पाहणी करून जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित योग्य उपाययोजना करण्यास सांगितले आहे.

सरकारतर्फे आवश्यक सहकार्य सर्व पातळ्यांवर सुरू आहे. शेतकरी बांधवांच्या संकटाच्या काळात शासनाच्या सर्व यंत्रणांनी जागरूक राहून मदतीसाठी सदैव तत्पर राहावे, यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

यावेळी तहसीलदार सौ.योगिता खटावकर यांना तातडीने सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande