अमरावती, 29 सप्टेंबर (हिं.स.)।गेल्या महिनाभरापासून हातपाय धुवून मागे लागलेल्या पावसाने आता शेतकऱ्यांच्य नाकीनऊ आणले. दिवस निघाला की देदणका... धुव्वाधार, कुठे मुसळधार पावसाच्या हजेरीने जिल्ह्यातील चौदाही तालुक्यातील शेतकरी आता रडकुंडीला आला असून हवालदिल झाला आहे. त्यामुळे आधीच विविध रोगाचे आक्रमण झालेले जिल्ह्यात सुमारे ६.७७ लाख हेक्टरवरील खरीप पिके आता जणू 'कोमात' गेल्याचे चित्र आहे. कारण २.४६ लाख हेक्टरवरील सोयाबीन अतिपावसाने संकटात सापडले असून कुठेपिवळेझालेतर कुठेशेंगा भरण्यापूर्वी मरणासन्न स्थितीत आहे. दुसरीकडे २.८६ लाख हेक्टरवरील कापसाची वाढ खुंटली, अतीपावसामुळे फुले - पाती बेपत्ता झाली आणि १.२० लाख हेक्टरवरील तुरीचे पीक कुठे जळाले, तर कुठे पिवळे पडले. त्यामुळे आता करावेतरी काय ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील एकूण ६ लाख ८२ हजार हेक्टरपैकी ६ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली. सोयाबीन, कापूस, तूरयामुख्यपिकांसह मूग, उडीद, ज्वारी व मका आदी पिकांखाली क्षेत्र आहे. विशेष म्हणजे कपाशीच्या क्षेत्रात यंदा वाढ झाली. यावर्षी २.६८ लाख हेक्टरवर कापसाचे पीक आहे. तर सोयाबीनचे क्षेत्र २.४६ लाख हेक्टर एवढे आहे. मात्र यंदा ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अधिक पाऊस सरासरीहून कोसळल्यामुळे शहरातील नागरिकांसह शेतकऱ्यांच्या सुद्धा आता नाकीनऊ आले आहे. सप्टेंबर महिन्यात सलग पाऊस कोसळत आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यातूनमान्सूनचानिरोप किमान ३० सप्टेंबरपर्यंत तरी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पावसाचा अनियमित पण जोरदार प्रभाव पुढील काही दिवस कायम राहणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी