धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध - मंत्री बाबासाहेब पाटील
लातूर, 29 सप्टेंबर (हिं.स.)। ​आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण मिळावे, या आपल्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीसाठी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानासमोर ''ढोल बजाओ
अ


लातूर, 29 सप्टेंबर (हिं.स.)।

​आरक्षणाच्या मागणीसाठी

धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण मिळावे, या आपल्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीसाठी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानासमोर 'ढोल बजाओ आंदोलन' करण्यात आले.

​पारंपरिक वेशात हजारोंचा सहभाग

​अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला. धनगर समाजाला एस.टी. आरक्षण मिळवून देण्यासाठी विधानसभेत ठोस भूमिका घेऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

​यावेळी धनगर समाजातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी पारंपरिक पोशाखात, धनगरी ढोल वाजवत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. ढोल बजाओ आंदोलनातून त्यांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

​आंदोलनकर्त्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मी धनगर समाजासोबत आहे, असे सांगत त्यांनी धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

​आरक्षणाचा हा महत्त्वपूर्ण मुद्दा विधानसभेत आणि सरकारपुढे गांभीर्याने मांडून धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्या या आश्वासनामुळे आंदोलकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

​राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा

​या आंदोलनात पांडुरंग लोकरे, हनुमंत देवकत्ते, डॉ. पांडुरंग टोम्पे, विठ्ठल तरडे, दयानंद सुरवसे, बळीराम भिगोले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

​या 'ढोल बजाओ' आंदोलनातून धनगर समाजाने पुन्हा एकदा सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की, आरक्षणाच्या मागणीवर तात्काळ तोडगा काढावा. जर सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर भविष्यात राज्यभर तीव्र आंदोलन पेटेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande