अमरावती, 29 सप्टेंबर (हिं.स.) पृथक विदर्भ राज्य मुक्ती संग्रामाच्या १२० वर्षांच्या लक्ष्धाला अधोरेखित करत रोजी, नागपूर करार निषेध दिवस म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात, या कराराची होळी करून पाळण्यात भाला. २८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेल्या नागपूर कराराने विदर्भाचा सर्वांगीण विकास होईल, अशा अनेक ठरतुदी करण्यात आल्या होत्या. मात्र या तरतुदी आजपर्यंत फसव्या ठरल्याचा आरोप करून विदर्भवाद्यांनी संताप व्यक्त केला. या प्रसंगी विदर्भ प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष रंजनाताई मामडे व पश्चिमविदर्भ अध्यक्ष प्रा. डॉ. पी. आर. राजपूत यांच्या नेतृत्वात आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र आगरकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुषमा मुळे, शिक्षक क्षेत्रातील उदयोन्मुख नेतृत्व प्रा. डॉ. प्रशांत विधे, शिव विचारांचे खंदे समर्थक नितीन पवित्रकार, कोअर कमिटी मेंबर डॉ. पद्मा राजपूत, प्रकाशलड्डा, डॉविजयकुबडे, सतीश प्रेमलवार, अफसर भाई, प्रकाश भाऊ साबळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत वक्तधांनी, विदर्भाच्या अन्यायग्रस्त वास्तवावर प्रकाश टाकला.राज्यातील २६ पैकी २३ खनिजे विदर्भात असूनही फक्त दोनच उद्योग येथे आले. तयार होणारा ६२०० मेगावॅट विजेपैकी केवळ २२०० मेगावॅट विजेचा वापर विदर्भासाठी केला जातो. १३१ पैकी केवळ १३ धरणे पूर्ण झाली असून उर्वरित निधीअभावी रखडली आहेत. शिक्षण, आरोग्य, रोजगार, वाहतूक, सिचन, शेतकरी आत्महत्या आणि नक्षलवाद या सर्वच क्षेत्रांत विदर्भाचे आजचे वास्तव विदारक असल्याचे त्यांनीनमूद केले, नागपूरकरार निषेध दिनाच्या कार्यक्रमास विदर्भ मुक्ती चळवळीतील कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विदर्भालान्यायद्या, पृथकविदर्भराज्य हवेच अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी रोख इसाक शेख मोहम्मद, अफसर नाई, राजेंद्र आगरकर, ललीत गवळी, प्रा. राजु पुसदेकर, विजयसिह सिसोदिया, रंजनाताई मामडें, प्रा. डॉ पृथ्वीराजसिह राजपूत, मोहमद अफसर, जिवन पंचगाडे, स्वप्नील वाकोडे,इंगळे, अनिल मावेश सु डोगरे, संदीप राऊत शुभम सु. सोनाने, राहुल खाडके किशोर पेंढारकर, अजम डोळस, अशोक ढोके, नितीन ओगले, साहेबराव वानखडे, अजय मिलके, दिलीप पेठे, दिवांशु वानखेडे, विनायक इंगोले, सतीश प्रेमलवार, प्रमोय तायडे डॉ. विजय कुबडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजेंद्र आगरकर, जीवन पचगाडे, अनिल वानखेडे यांनी परिश्रम घेतले.---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी