अमरावती : चांदूर रेल्वे तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी 13 कोटी 43 लाखांची मदत प्राप्त
अमरावती, 29 सप्टेंबर (हिं.स.)राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानी पोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी नुकतीच शासनस्तरावरून मदत जाहीर झाली आहे. यात चांदूर रेल्वे तालुक्यासाठी एकूण १३ कोटी ४३ लाख ९१ ह
चांदूर रेल्वे तालुक्यात अतीवृष्टी, १९ हजारावर शेतकरी बाधित  शेतकऱ्यांसाठी 13 कोटी 43 लाखांची मदत आ.प्रतापदादा अडसड यांच्या पाठपुराव्याला यश


अमरावती, 29 सप्टेंबर (हिं.स.)राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानी पोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी नुकतीच शासनस्तरावरून मदत जाहीर झाली आहे. यात चांदूर रेल्वे तालुक्यासाठी एकूण १३ कोटी ४३ लाख ९१ हजार ६३० रुपयाची मदत प्राप्त झाली आहे. प्रति हेक्टर साडे आठ हजार रुपयाप्रमाणे चांदूर रेल्वे तालुक्यासाठी एकूण १३ कोटी ४३ लाख ९१ हजार ६३० रुपयाची मदत प्राप्त झाली आहे. प्रति हेक्टर साडे आठ हजार रुपयाप्रमाणे लवकरच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

तालुक्यात सुरवातीला समाधान कारक पाऊस सुरू असताना पीक ऐनबहरत असताना ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यातअतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे स्वप्न पावसात वाहून गेले. उरले सुरले पीक आता कापणीला आले असताना पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने तेही हातचे निसटले आहे, राज्यभर शेतकऱ्यांच्या आक्रोश पाहता शासनाने लगेच मदत घोषित केली आहे. त्यानुसार दसऱ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत पोहचणार असल्याची माहिती आहे. तालुक्यात एकूण १९ हजार पाचशे दहा इतके शेतकरी अतिवृष्टी बाधित झाले असून शेतीचे क्षेत्रफळ १५ हजार ८१० असे आहे. तालुक्यातील सातेफळ, पळसखेड, घुईखेड, चांदूर रेल्वे, व आमला विश्वेश्वर हे पाचही मंडळे अतिवृष्टी धारक असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत पोहचणार असल्याचे तहसील कार्यालयातून माहिती मिळाली आहे.येथे कापूस पिकाचे १६४२ हेक्टर, तुरीचे ५०० हेक्टर नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसला. त्याचे क्षेत्रफळ १३ हजार ६६८ इतका आहे. सर्वाधिक फटका आमला विश्वेश्वर मंडळात बसला असून त्या पाठोपाठ चांदूर रेल्वे मंडळाला बसला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande