लातूरमध्ये पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पत्रकार धावले, 31285 रकमेसह कपडे केले जमा
लातूर, 29 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्रसह उदगीर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या शेतीसह गुरे , विहिरी, घरांचे मोठे नुकसान झाले हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी सामाजिक जाननिवेतून उदगीरातील संवेदनशि
Q


लातूर, 29 सप्टेंबर (हिं.स.)।

महाराष्ट्रसह उदगीर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या शेतीसह गुरे , विहिरी, घरांचे मोठे नुकसान झाले हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी सामाजिक जाननिवेतून उदगीरातील संवेदनशिल पत्रकारांनी मदत फेरी काढत जमा झालेली मदत रुपये 31 हजार 285 रुपये रोख व कपडे उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्याकडे करण्यात आले.

मदत फेरीची सुरुवात उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे व तहसीलदार राम बोरगावकर यांच्या उपस्थितीमध्ये नगर परिषदेजवळ करण्यात आले.

यावेळी पञकार बिभीषण मद्देवाड , सुनील हवा ,सिद्धार्थ सूर्यवंशी , सचिन शिवशेट्टे ,हणमंत केंद्रे. विनायक चाकूरे,

निवृत्ती जवळे, नागनाथ गुट्टे ,रऊफ पठाण, रामदास केदार, लक्ष्मण बेंबडे, विक्रम हालगीकर, रसूल पठाण, माधव रोडगे , जावेद शेख ,नासेर काझी,आशोक कांबळे , मंगेश सुर्यवंशी, अनिल जाधव ,अरुण उजेडकर आदींनी मदत फेरीत सहभाग घेतला.

मदत फेरी नगर परिषद छत्रपती शिवाजी महाराज चौक उद्योग भवन , पत्तेवार चौक मुक्कावार चौक जात हनुमान कट्टा येथे समारोप करण्यात आला. येथील व्यापाऱ्यांनी नागरिकांनी या मदत करीत मदत केली

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande