नांदेड, 29 सप्टेंबर (हिं.स.)।
नांदेड जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले त्यापेक्षाही नागरिकांच्या घरात पाणी शिरले
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात गावांना वेढा पडला आहे पुराच्या पाण्यामुळे नागरिक त्रस आहेत
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राहेगाव येथे गेल्या दोन दिवसापासून गोदावरी नदी पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे गावाला संपूर्ण वेढा पडला आहे
पाण्याचा या अतिवृष्टीग्रस्त भागाची मतदारसंघाचे आमदार आनंद बोंढारकर यांनीपाहणी केली. मुसळधार पावसामुळे नदीचे पात्र तुडुंब भरून शेतात पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले.
तसेच, गावाकडे जाणारे रस्ते आणि पूल यांचेही गंभीर नुकसान झाले.
संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून शेतकरी आणि ग्रामस्थांना मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश आमदार आनंद भंडरकर यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis