छ. संभाजीनगर : संघाचा विजयादशमी उत्सव, पथसंचलन उत्साहात
छत्रपती संभाजीनगर, 29 सप्टेंबर (हिं.स.) : “संघाच्या शंभर वर्षाच्या प्रवासात स्वयंसेवकांच्या परिवाराचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष योगदान असल्याचे प्रा. डॉ. श्री संजय गायकवाड यांनी येथे सांगितले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव शहरातील चाणक्य न
अ


छत्रपती संभाजीनगर, 29 सप्टेंबर (हिं.स.) : “संघाच्या शंभर वर्षाच्या प्रवासात स्वयंसेवकांच्या परिवाराचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष योगदान असल्याचे प्रा. डॉ. श्री संजय गायकवाड यांनी येथे सांगितले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव शहरातील चाणक्य नगर येथे संपन्न झाला. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या स्थापनेला या विजयादशमीला शंभर वर्ष पूर्ण होत असून स्वाभाविकच त्याचा उत्साह संपूर्ण स्वयंसेवकांमध्ये आहे. संघाच्या या शंभर वर्षाच्या प्रवासात संपूर्ण हिंदू समाजाचे आणि स्वयंसेवकांच्या परिवाराचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. समाजाच्या सहकार्यामुळेच हा शताब्दी प्रवास यथोचित झाला आहे. परंतु संघाचे कार्य अविरत अखंडपणे चालणारे आहे. मातृभूमीला परम वैभवसंपन्न करण्यासाठी सर्वांना सोबत मिळून काम करावे लागणार आहे. संघाच्या पंच परिवर्तनातून समाज परिवर्तन आपल्याला घडवून आणायचे आहे असे वक्तव्य विश्व हिंदू परिषदचे प्रांत अध्यक्ष संजय गायकवाड यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे श्री शांतीलाल तेजमल सिंगी (अध्यक्ष वर्धमान नागरिक सहकारी पतसंस्था) व नगर संघचालक अशोक रंगदळ उपस्थित होते

उत्सवाची सुरुवात शस्त्र पूजन करून झाली. छत्रपती संभाजीनगर शहरात असे एकाच दिवशी विश्वकर्मा नगर, सिद्धार्थ नगर या नगरांचेही उत्सव संपन्न झाले., तर आंबेडकर नगर, भगतसिंग नगर व चंद्रगुप्त नगरात पतसंचलन झाले. सिद्धार्थ नगर येथे प्रमुख वक्ते श्री आदित्य धाराशिवकर (विभाग गोसेवा संयोजक, रा.स्व.संघ), प्रमुख पाहुणे डॉ सुरेंद्र जैस्वाल विश्वकर्मा नगर येथे प्रमुख वक्ते श्री भूषण भालेराव (विभाग कार्यकारिणी सदस्य, रा.स्व.संघ), प्रमुख पाहुणे श्री हरिहरन लांडगे प्रमुख पाहुणे श्री अनिल प्रभाकर काळे (प्रसिद्ध उद्योजक) यांची प्रमुख उपस्थिती होते. त्यांनी उपस्थित स्वयंसेवक व नागरिकांना उद्बोधन केले.

संजय गायकवाड म्हणाले, पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली ती भारताला पुन्हा परम वैभवसंपन्न करण्यासाठी. हिंदू समाज आपले स्वत्व विसरल्यामुळे परकीय आक्रमकांनी आपले अतोनात नुकसान केले. इस्लामिक आक्रमकांनी हिंदू अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला, तर ब्रिटिशांनी येथील पूर्ण समाजात भेद निर्माण करून आपापसात भांडण लावण्याचे कारस्थान रचले. त्यामुळे पुन्हा आपला समाज गुलामगिरीत जाणार नाही आणि परस्परात एकता व समरसता राहील यासाठी संघाने मागील शंभर वर्ष विविध प्रकारे जागरण कार्य केले. येणारा काळ अनेक आव्हानांनी भरलेला आहे. त्यासाठी समाजात एकजूट राहणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी संघाने सांगितलेली पंच परिवर्तन आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. त्यासाठी आपल्याला कटिबध्द व्हायचे आहे. संघकार्य हे ईश्वरीय कार्य आहे. यामध्ये स्वयंसेकांसोबत त्याचे परिवार, समाजातील सज्जनशक्ती, माता भगिनी अनेकांचे योगदान राहिले आहे, असे ते म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने गणवेशधारी स्वंयसेवक व नागरिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande