छत्रपती संभाजीनगर, 29 सप्टेंबर (हिं.स.)।सकल वंजारी समाज आयोजित रास-गरबा महोत्ससवात राज्याचे सामाजिक न्याय तथा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सहभाग नोंदवला
छत्रपती संभाजी नगर येथेसकल वंजारी समाजाच्या वतीने भव्य रास-गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक मंडळाकडून पालकमंत्री शिरसाट यांनी सन्मानाचा सत्कार स्वीकारला.या निमित्ताने अनेक भगिनी व गरबा प्रेमींनी उत्साहात सहभाग नोंदवत नवरात्रीच्या उत्सवाला अनोखी रंगत आणली. आई जगदंबेच्या चरणी सर्वांसाठी सुख, समृद्धी व मंगलमय जीवनाची प्रार्थना केली
---------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis