अमरावती : सुकळीच्या शाळेने पथनाट्यातून दिला प्लास्टिक मुक्तीचा संदेश!
अमरावती, 29 सप्टेंबर (हिं.स.)। स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत सुकळी येथील पीएम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वच्छता संदेशाच्या घोषणानी सारा आसमंत दुमदूमला. दरम्यान, गावाती
सुकळीच्या शाळेने पथनाट्यातून दिला प्लास्टिक मुक्तीचा संदेश! • स्वच्छता पंधरवाडा, विविध उपक्रमाचे आयोजन  • विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी घेतली स्वच्छतेची शपथ


सुकळीच्या शाळेने पथनाट्यातून दिला प्लास्टिक मुक्तीचा संदेश! • स्वच्छता पंधरवाडा, विविध उपक्रमाचे आयोजन  • विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी घेतली स्वच्छतेची शपथ


अमरावती, 29 सप्टेंबर (हिं.स.)। स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत सुकळी येथील पीएम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वच्छता संदेशाच्या घोषणानी सारा आसमंत दुमदूमला. दरम्यान, गावातील प्रमुख चौकात विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे उत्कृष्ट सादरीकरण करून प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला. यावेळी नागरिकांना स्वच्छता व प्लास्टिक मुक्तीची शपथ देण्यात आली. १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवाडाचे आयोजन करण्यात आले असून शाळेत विविध उपक्रम राबविले जात आहे.

शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत राज्यातील शाळांत १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार सुकळी येथील पीएम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने शनिवारी (ता. २७ ) गावातून स्वच्छताविषयी जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. रॅलीतील विद्यार्थ्यांच्या हातातील स्वच्छता व प्लास्टिक मुक्तीच्या घोषनांचे फलक लक्ष वेधून घेत होते. चिमुकल्यांची राष्ट्रपिता महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगेबाबा यांची वेशभूषा लक्षवेधी ठरली. दरम्यान, गावातील प्रमुख चौकात विद्यार्थ्यांनी विविध पथनाट्याचे उत्कृष्ट सादरीकरण करून प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला. यावेळी पथनाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांच्या कलेची प्रशंसा करीत नागरिकांनादेखील यावेळी स्वच्छता व प्लास्टिक मुक्तीची शपथ घेतली.

१६ ते ३० सप्टेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवाडाचे आयोजन करण्यात आले असून शाळेत स्वच्छता पंधरवढ्याच्या दिनदर्शिकेनुसार प्रत्येक दिवशी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पहिला दिवस विद्यार्थी व शिक्षक यांना स्वच्छतेची शपथ दिवस म्हणून पाळला. त्यानंतर स्वच्छता जनजागृती दिवस, ग्रीन स्कुल दिन, समुदाय परिसरातील भेट दिवस, हात धुणे दिवस, स्वच्छता सहभाग दिन, वैयक्तिक स्वच्छता दिन, स्वच्छता शाळा प्रदर्शन दिन, स्वच्छता कृती आराखडा दिवस आदी उपक्रम घेण्यात आले. मंगळवारी (दि. ३०) पारितोषिक वितरण दिनाने या पंधरवाढ्याची सांगता होणार आहे. यावेळी स्वच्छता रॅलीत सरपंच राजूभाऊ गजभिये, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुणवंत बोरकर यांच्यासह नागरिक, विद्यार्थी व शिक्षक यांनी उपस्थिती दर्शवून सहभाग नोंदविला. स्वच्छता पंधरवाडा यशस्वी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी संदिप बोडखे यांच्या आदेशानुसार उच्च श्रेणी मुख्याध्यापक निखिल सवाई यांच्या मार्गदर्शनात शिक्षक गणेश ठाकरे यांच्यासह आदी शिक्षक परिश्रम घेत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande