लातूर, 30 सप्टेंबर (हिं.स.) : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे लातूर शहर व परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घरांचे साहित्य, भिंती तसेच मालमत्तेला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचली आहे. भारतीय जनता पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष अजित कव्हेकर यांनी
श्री सिद्धेश्वर नगर भागाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.तसेच माताजी नगर, पटेल नगर आणि दुर्गादेवी चौक या भागांना भेट दिली
यावेळी सचिन सूर्यवंशी, मेहबूब साहब सय्यद, आकाश बिराजदार यांच्या घरांना झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधताना भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित कव्हेकर म्हणाले की, सरकार नुकसानग्रस्त नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. आपल्याला तातडीने नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते प्रयत्न वेगाने सुरू आहेत अशी माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis