चंद्रपूर, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। स्वस्थ्य नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय मूल येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण 2092 रुग्णांची नोंद करण्यात आली. सदर शिबिरात 10 रुग्णांची अंडवृदधी शस्त्रक्रिया, तसेच 2 रुग्णांवर हरनियाची शस्त्रक्रिया करण्यात आली. शिबिरात 47 रक्तदात्यांनी रक्तदान करण्यात आले. तसेच 137 सोनोग्राफी करण्यात आले व 21 प्रकारच्या विशेषज्ञ डॉक्टरची सेवा पुरविण्यात आली.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटरे, मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नके, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शीतल सोनारकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र लाडे तहसीलदार मृदुला मोरे, संध्या गुरनुले, हरीश शर्मा, चंदू मारगोनवार, प्रवीण मोहुर्ले, नंदू रणदिवे, आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव