चिखलदऱ्याच्या पवन ऊर्जा प्रकल्प गेल्या वर्षभरापासून ठप्प
अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.) : मेळघाटची पर्यटन नगरी चिखलदऱ्या लगत असलेल्या मोथा गावाजवळील मेडा (महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी) तर्फे विकत घेतलेल्या 50 हेक्टर जमिनीवर सन 2003 मध्ये तत्कालीन केंद्रीय ऊर्जा मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्घाट
चिखलदऱ्याच्या मोथा गावाजव मेडाचा  पवन ऊर्जा प्रकल्प गेल्या वर्षभरापासून ठप्प  2 मेगावॅट विजेचे उत्पादन थांबले


अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.) : मेळघाटची पर्यटन नगरी चिखलदऱ्या लगत असलेल्या मोथा गावाजवळील मेडा (महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी) तर्फे विकत घेतलेल्या 50 हेक्टर जमिनीवर सन 2003 मध्ये तत्कालीन केंद्रीय ऊर्जा मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्घाटन झालेले दोन पवन ऊर्जा पंखे गेल्या एक वर्षापासून बंद पडलेले आहेत. मेडा याकडे दुर्लक्ष करत असल्याने दररोज निर्माण होणाऱ्या 2 मेगावॅट विजेचे उत्पादन थांबले असून, मागील 20 वर्षांपासून घेतलेल्या जमिनीचाही योग्य वापर होत नाही. दरम्यान, मध्यप्रदेशातील कुकरू-खामला येथे अशा तब्बल 100 पवन ऊर्जा पंख्यांची उभारणी झाली आहे. मात्र चिखलदऱ्यातील पवन ऊर्जा प्रकल्पाची संख्या गेल्या 20 वर्षांत 2 वरून 3 वर पोहोचली नाही, उलट जे सुरु झालेले पंखे होते ते सुद्धा ठप्प झाले आहेत. यामध्ये मेडाची निष्काळजीपणा, तसेच जिल्ह्यातील कारण मानले जात आहे. विश्वसनीय माहितीनुसार मेडा व पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, असे सुजलॉन कंपनी यांच्यातील आर्थिक व्यवहारांच्या वादामुळे हे पंखे बंद असल्याचे समजते. कंपनीने या प्रकल्पाची 20 वर्षे हमी व देखरेखीची जबाबदारी घेतली होती. 2023 मध्ये ती मुदत पूर्ण झाली असून, प्रकल्पाचे स्ट्रक्चर ऑडिट करून पुढे किती काळ चालू ठेवता येईल, कोणते पार्ट बदलावे लागतील हे ठरवायचे होते. मात्र 2023 पासून आजतागायत ही प्रक्रिया सुरुच झालेली नाही, परिणामी पंखे बंदच राहिले आहेत. याकडे ना जनप्रतिनिधी लक्ष देत आहेत, ना लोक आवाज उठवत पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. आहेत, त्यामुळे मेडा याकडे पवन ऊर्जा करण्याची व या परिसरात बंद पडलेले पंखे पुन्हा सुरु आणखी पंख्यांची उभारणी करण्याची तितकी क्षमता असून, त्याचा गरज आहे. या भागात लाभ वाया जाऊ नये अशी मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande