अमरावती: दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला धनादेश
अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.)अलीकडील पूरस्थितीमुळे शेतकरी बांधवांवर ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी हिताचे महत्त्वपूर्ण ठराव एकमुखी मंजूर करण्यात आले. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा
दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला धनादेश; शेतकरी हिताचे ठराव एकमुखी मंजूर


अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.)अलीकडील पूरस्थितीमुळे शेतकरी बांधवांवर ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी हिताचे महत्त्वपूर्ण ठराव एकमुखी मंजूर करण्यात आले. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून समितीच्या वतीने रुपये २५,०००/- चा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तहसीलदार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.या सभेत एकूण चार ठराव घेण्यात आले. ओल्या दुष्काळाची तात्काळ घोषणा करून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत देण्यात यावी, शेतकऱ्यांचे तारणहार डॉ. पंजाबराव देशमुख यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा, आणि नाफेडमार्फत विकलेला ज्वारीचा दुसरा हप्ता तात्काळ देण्यात यावा, अशी ठरावे सभेत मंजूर झाले.या निर्णयांमुळे शेतकरी वर्गाच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे ठराव अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. बळवंत वानखडे व जिल्हा सहकारी क्षेत्रातील ज्येष्ठ नेते सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारित करण्यात आले.ठराव सुपूर्त करताना बाजार समितीचे सभापती सुनिल गावंडे, उपसभापती श्रीकृष्ण उर्फ राजू पाटील कराळे, बाळासाहेब हिंगणिकर, अनिल पाटील भारसाकडे, गजानन पाटील देवतळे, प्रभाकर पाटील तराळ, अजय देशमुख आणि सहसचिव सुनिल कोकाटे आदी उपस्थित होते.शेतकरी बांधवांच्या हितासाठी बाजार समितीने उचललेले हे पाऊल म्हणजे सामाजिक बांधिलकीचा उत्कृष्ट नमुना मानला जात आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळावा, ही शेतकऱ्यांच्या भावना अधोरेखित करणारी ठरवली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande