अमरावती : रेल्वेपूल हलक्या वाहनांसाठी सुरू करण्यासाठी पोलिसांकडून बांधकाम व रेल्वे विभागाला पत्र
अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.) : अमरावतीचा रेल्वे ओव्हरब्रिज बंद असल्यामुळे नागरिक व वाहनधारकांची चांगलीच तारांबळ होत असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित पूल पादचारी व दुचाकीच्या वाहतुकीकरिता सुरु करण्यात यावा, असे पत्र पोलिसा
रेल्वेपूल हलक्या वाहनांसाठी सुरू करा पोलिसांचे बांधकाम व रेल्वे विभागाला पत्र


अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.) : अमरावतीचा रेल्वे ओव्हरब्रिज बंद असल्यामुळे नागरिक व वाहनधारकांची चांगलीच तारांबळ होत असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित पूल पादचारी व दुचाकीच्या वाहतुकीकरिता सुरु करण्यात यावा, असे पत्र पोलिसांमार्फत बांधकाम व रेल्वे विभागाला देण्यात आले आहे. रेल्वे ओव्हारब्रिज मागील एक ते दीड महिन्यापासून बंद असल्यामुळे अमरावतीकरांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. तसेच नवरात्रौउत्सवदरम्यान अंबादेवी व एकवीरा देवी मंदिरात जाण्याकरिता महिलांसह नागरिकांना प्रचड त्रास होत आहे. संबंधित विभागाने एका ऑडिट रिपोर्टवर उड्डाणपूल बंद केला, दुसऱ्यांदा ऑडिट रिपोर्ट करण्याची आवश्यकता होती. मात्र दुसरे ऑडिट न करता उड्डाणपूल पूर्णपणे बंद केला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे उड्डाणपुलाखाली मालगाडी उभी राहते तसेच पुलाच्या खालून वाहनांची ये-जा सुरु असते, त्यामुळे सुध्दा धोका निर्माण होऊ शकतो. यासर्व बाबी पाहता ज्या ठिकाणी उड्डाणपूल शिकस्त झाला आहे त्या ठिकाणी लोखंडी गर्डर किंवा बिम टाकून पुलाला आधार दिला तर पुलावरून पदचारी व दुचाकी वाहन जाऊ शकतात. त्यामुळे शहरात होणारी वाहतुकीची कोंडी कमी होईल.त्यामुळे पाट्वारी व उड्डाणपुलावरून करण्याकरिता पर्यायी दुचाकी सुरु मार्ग काढण्यात यावा, असे पत्र पोलीस विभागामार्फत दोन्ही विभागाला देण्यात आले आहे, असे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande