
लखनौ, 10 जानेवारी (हिं.स.)। अयोध्या जिल्ह्यातील राम जन्मभूमी मंदिर परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. तो व्यक्ती तेथे नमाज अदा करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र परिसरात उपस्थित सुरक्षाकर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ पकडले.
प्राथमिक माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या व्यक्ती काश्मीरचा रहिवासी असून त्याचे नाव अहमद शेख आहे. सुरक्षाकर्मचाऱ्यांनी त्याला रोखल्यावर तो कथितरित्या एका विशिष्ट समुदायाचे घोषवाक्य देऊ लागला, त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला त्वरित ताब्यात घेतले. या संपूर्ण प्रकरणावर जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही. तसेच राम मंदिर ट्रस्टनेही या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या त्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule